दापोली : एसटी-रिक्षा टेम्पोची धडक; रिक्षा टेम्पोचालक जखमी

Sep 21, 2024 - 11:36
 0
दापोली : एसटी-रिक्षा टेम्पोची धडक; रिक्षा टेम्पोचालक जखमी

दापोली : लाडघर येथे किन्हळ-बुरोंडीमार्गे दापोली येणारी एसटी आणि रिक्षा टेम्पो यांच्या झालेल्या धडकेत रिक्षा टेम्पोचालक जखमी झाला. 

चालक विद्याधर मालगुंडकर हे एसटी घेऊन सकाळी सव्वासहा वाजता किन्हळमधून निघाले. ही एसटी लाडघर येथे आली असताना दापोलीकडून येणाऱ्या रिक्षा टेम्पोशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षा टेम्पोचाल अल्लासाहब ऊर्फ मुन्ना काणे (वय ३८, रा. काळकाई कोंड आझादनगर) जखमी झाला आहे. टेम्पोतून कोंबड्या घेऊन बुरोंडीकडे जात असताना अपघात झाला. अपघातात काणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी दापोली येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow