चिपळूण : गोवळकोट रोड, गोविंदगडावर स्वच्छता मोहीम

Sep 21, 2024 - 11:39
 0
चिपळूण : गोवळकोट रोड, गोविंदगडावर स्वच्छता मोहीम

चिपळूण : चिपळूण पालिकेच्या स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत शुक्रवारी (ता. २०) शहरातील गोवळकोट रोड व गोविंदगड परिसरात राजे प्रतिष्ठानचे सदस्य पालिकेच्या सहकायनि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

सध्या शहरातील विविध भागात स्वच्छता अभियान आहे. गोविंदगडावर स्वच्छंता केल्यानंतर बाजारपूल, पेठमाप परिसरातील गणेश विसर्जन घाटांची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याच्या दुतर्फा गवत काढून स्वच्छता केली. सार्वजनिक चौकातही लोकसह‌भागातून स्वच्छता करण्यात आली. 

स्वच्छता मोहिमेसाठी आनंदराव पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी गणेश विसर्जन घाटाची स्वच्छता केली. त्यानंतर चिपळूण पालिका हद्दीमधील नारायण 
तलावासमोरील परिसर स्वच्छ करण्यात आला. 

मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे कामकाज हे महेश जाधव व सुजित जाधव यांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. या मोहिमेत मुकादम मधुकर मोहिते, दीपक किंजळकर, दीपक जाधव, संकेत मोहिते, रोहन सकपाळ, अनिल खापरे, शशिकांत यांदिवडे, राजेंद्र नवरत आदीनी सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow