रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा आकस्मिक मृत्यू

Sep 21, 2024 - 11:51
 0
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून आमवाताने आजारी असलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.१५ वा. घडली. सविता गंगाराम शेळके (३५, रा. शिवस्मित अपार्टमेंट, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. 

सविता शेळके यांना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आमवाताचा त्रास असल्याने त्या आजारी होत्या. त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, बुधवार १८ सप्टेंबर रोजी त्यांची तब्बेत जास्त झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow