फिडेच्या १०० व्या वर्धापन दिनी रत्नागिरीत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Jul 18, 2024 - 16:22
 0
फिडेच्या १०० व्या वर्धापन दिनी रत्नागिरीत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

◼️ रत्नागिरी चेस अकॅडेमी तर्फे आयोजन : उज्ज्वला क्लासेस रत्नागिरी यांचे प्रायोजकत्व; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी फिडे आग्रही

रत्नागिरी : जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) २० जुलै रोजी आपला १०० वा वर्धापन दिन साजरा करत असून त्याच निमित्ताने त्यांनी वर्षभर फिडे १०० या उपक्रमाखाली नानाविध उपक्रम राबविले होते. ह्याच उपक्रमाची सांगता म्हणून फिडेने संपूर्ण जगभरात एका दिवसात ऑनलाईन व ऑफलाईन प्रकारात खेळल्या गेलेल्या जास्तीत जास्त मॅचेस चा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठीचा हा अटेम्प्ट करण्याचे ठरविले असून त्याच हाकेला साद देत रत्नागिरी चेस अकॅडेमी मार्फत खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सदर संपूर्ण स्पर्धेला उज्ज्वला क्लासेस रत्नागिरी यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

सदर स्पर्धा फिडेकडून या गिनीज बुक रेकॉर्ड अटेम्प्ट साठी मान्यताप्राप्त अश्या भारतातील निव्वळ ७८ स्पर्धांपैकी एक आहे. ह्या स्पर्धेत एकूण १००००/- रुपयांची रोख बक्षिसे आणि आकर्षक चषक व मेडल्स विविध गटातील विजेत्या खेळाडूंना पटकावण्याची संधी रत्नागिरी व बाजूच्या भागातील खेळाडूंना असून जास्तीत जास्त खेळाडूंनी ह्या स्पर्धेत सहभाग नोंदवून ह्या जागतिक रेकॉर्ड साठी आपला खारीचा वाटा उमटवावा, असे आवाहन उज्ज्वला क्लासेसचे श्री. पुरुषोत्तम पाध्ये यांनी केले आहे. 

या स्पर्धेत विजेत्याला रु. १५००/- व चषक; उपविजेत्याला रु. १२००/- व चषक; तिसऱ्या क्रमांकास रु. १०००/- व चषक याचबरोबर चौथ्या ते दहाव्या क्रमांकास अनुक्रमे रु. ८००/-, रु. ७००/-, रु. ६००/-, रु. ५००/-, रु. ३००,  रु. ३००,  रु. ३०० अशी बक्षिसे मुख्य बक्षिसे असून महिलंच्या व वरिष्ठ खेळाडूंच्या गटात रु. ३००/- व रु. २००/- अशी रोख बक्षिसे, १०,११,१२,१३,१४,१५ वर्षाखालील गटात रु. २००/- व रु. १००/- अशी रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याचे रत्नागिरी चेस अकॅडमी चे विवेक सोहनी यांनी सांगितले. 

सदर स्पर्धेला रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेची मान्यता असून स्पर्धा खुल्या गटात साखळी पद्धतीने खेळवली जाईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना नाममात्र रु. १००/- असे प्रवेश शुल्क असून आयोजकांमार्फत खेळाडूंच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकांनी नावनोंदणी साठी विवेक सोहनी ९४२२४७४५४६ / चैतन्य भिडे ८०८७२२००६७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:51 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow