रत्नागिरीत 'पोलिस शिपाई' साठी झाली लेखी परीक्षा

Jul 30, 2024 - 11:05
Jul 30, 2024 - 11:57
 0
रत्नागिरीत 'पोलिस शिपाई' साठी झाली लेखी परीक्षा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाची शिपाई पदाची लेखी परीक्षा रविवार २८ जुलै रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय, मेस्त्री हायस्कूल, श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, जीजीपीएस आणि शिर्के हायस्कुल या पाच ठिकाणी पार पडली. 

शारिरीक चाचणी परीक्षेत ५० टक्के गुण मिळवलेले १ हजार ६३४ उमेदवार या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून सर्व पाचही परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. परिक्षा केंद्रातच उमेदवारांना रायटिंग पॅड आणि काळे पेन उपलब्ध करून देण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow