भाजप महिला मोर्चा गुहागर तालुकाध्यक्षपदी अपूर्वा बारगोडे

Jul 30, 2024 - 11:00
Jul 30, 2024 - 12:01
 0
भाजप महिला मोर्चा गुहागर तालुकाध्यक्षपदी अपूर्वा बारगोडे

गुहागर : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षपदी वेळंब गावच्या अपूर्वा बारगोडे यांची एकमताने माजी आमदार आणि विधानसभा गुहागर निवडणूक प्रमुख डॉ. विनय नातू यांनी नियुक्ती घोषित केली आहे. 

जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी बारगोडे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. डॉ. नातू यांनी त्यांच्याकडे गुहागर तालुका महिला मोर्चाची जबाबदारी दिली आहे. या निवडीबद्दल महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, प्रदेश कार्यकारिणी सदस्य निलम गोंधळी, माजी सभापती स्मिता धामणस्कर, जिल्हा उपाध्यक्ष नम्रता निमुणकर, दीप्ती असगोलकर, धनश्री मांजरेकर, श्रद्धा घाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow