रत्नागिरी शहरातील खड्डे भरण्यास मागवले कोल्डमिक्स, पावसाळी डांबर

Jul 30, 2024 - 12:07
 0
रत्नागिरी शहरातील खड्डे भरण्यास मागवले कोल्डमिक्स, पावसाळी डांबर

रत्नागिरी : पाऊस सरीवर सुरू झाल्याने रत्नागिरी शहरातील खड्डे भरण्याला वेग आला आहे. डांबर, खडी, रेती नाही म्हणून खड्डे भरण्याचे काम थांबू नये, यासाठी साहित्य मागविण्यात आले आहे. पावसाने अशीच उघडीप दिली तर १५ ऑगस्टपर्यंत शहरातील सर्व खड्डे भरले जाऊ शकतील, असे रत्नागिरी नगर परिषदेच्या (रनप) बांधकाम विभागाचे अभियंता यतिराज जाधव यांनी सांगितले.

मुसळधार पाऊस आणि सततची जड अवजड, हलक्या वाहनांची वाहतूक होत असल्याने शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले. मारुती मंदिर ते जयस्तंभपर्यंत काँक्रिटीकरण करण्यासाठी पहिला रेती, डांबराचा थर टाकण्यात आला होता. पावसाची सुरुवात मुसळधारपणे सुरु झाली ती पुढेही तशीच राहिल्याने काँक्रिटीकरणाचे काम थांबले.

पावसामुळे टाकलेला पहिला थरही वाहून थांबू गेल्याने खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसू लागले. कोल्ड आता एका मार्गावरील पहिल्या थरातील रेती जाते. हटवण्यात आली आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पाऊस साथ देत नव्हता. त्यामुळे वाहनधारकांना खड्यातूनच प्रवास करावा लागत होता. त्यामुळे या खडड्यांची जोरदार चर्चा सुरु झाली. हीच संधी काही राजकीय नेत्यांनी साधली आणि राजकारण सुरू झाले.

दरम्यानच्या काळात रत्नागिरी नगर परिषदेने खडी, रेती, डांबराने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. आता तर पाऊस सरीवर असल्याने खड्डे भरण्यास वेग आला आहे. पावसाळी डांबर, कोल्डमिक्स मटेरिअलअभावी खड्डे भरण्याचे काम थांबू नये, यासाठी हे साहित्य मागविण्यात आले आहे. मिक्स मटेरिअल खड्यांमध्ये पसरवून टाकले जाते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow