भारतीय टेनिसचा 'आयरन मॅन' रोहन बोपन्ना निवृत्त

Jul 30, 2024 - 11:28
Jul 30, 2024 - 12:31
 0
भारतीय टेनिसचा 'आयरन मॅन' रोहन बोपन्ना निवृत्त

पॅरिस : भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नानं (Rohan Bopanna Retirement ) निवृत्ती जाहीर केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) अपयश आल्यानंतर बोपन्नानं हा निर्णय घेतला.

भारताकडून टेनिसमध्ये रोहन बोपन्ना आणि एन श्रीराम बालाजी यांनी सहभाग घेतला होता. या दोघांच्या जोडीला पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. रोहन बोपन्ना आणि एन श्रीराम बालाजी यांना 7-5, 6-2 असा पराभव स्वीकारावा लागला. रोहन बोपन्ना यानं त्या सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली आहे. बोपन्नानं भारतासाठी जवळपास 22 वर्ष टेनिस खेळलं.

रोहन बोपन्नानं निवृत्ती जाहीर करताना म्हटलं की ही माझ्या टेनिस करिअरची अखेरची स्पर्धा होती. एक खेळाडू म्हणून मी कुठं पोहोचलो आहे, हे मला माहिती आहे. मी जे आतापर्यंत केलं ते माझ्यासाठी एका यशाप्रमाणं आहे.भारताचं प्रतिनिधीत्व 20 वर्षांपेक्षा अधिक काळ करेन, असं वाटलं नव्हतं. 2002 मध्ये पदार्पण आणि 22 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व केल्यानंतर निवृत्ती घेत आहे. मला या ऐतिहासिक कारकिर्दीवर गर्व आहे, असं रोहन बोपन्ना म्हणाले.

आशियाई गेम्समधूनही माघार

रोहन बोपन्ना यांनी ऑलिम्पिक सुरु असतानाच निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळं 2026 मध्ये होणाऱ्या आशियाई गेम्स मध्ये देखील ते खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्जा यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक दिली होती. मात्र, त्यांना पदक जिंकता आलं नव्हतं. यावेळ एन. श्रीराम बालाजी याच्यासोबत पदक जिंकण्याची संधी होती. मात्र, फ्रान्सच्या गेल मोनफिल्स आणि रॉजर वेसेलिन यांच्या जोडीनं त्यांना पराभूत केलं.

रोहन बोपन्ना यांनी त्यांच्या ऐतिहासिक टेनिस करिअरमध्ये 6 वेळा दुहेरी स्पर्धेत ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यापैकी 2 वेळा ग्रँड स्लॅमचं विजेतेपद मिळालं. 2017 मध्ये कॅनडाच्या गेब्रियला डैब्रोवस्की यांच्यासोबत मिश्र दुहेरीचं फ्रेंच ओपनचं विजेतेपद बोपन्ना यांनी मिळवलं. 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅत्यू एब्डन सोबत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा देखील त्यांनी जिंकली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow