मंडणगड तालुक्यात १२ हजार ४५६ बांबू रोपांचे वाटप

Jul 30, 2024 - 10:47
Jul 30, 2024 - 15:48
 0
मंडणगड  तालुक्यात  १२ हजार ४५६ बांबू रोपांचे वाटप

मंडणगड : तालुक्यात बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पंचायत समितीच्या वतीने २७ प्रगतिशील शेतकऱ्यांना १२ हजार ४५६ बांबू रोपांचे नुकतेच वाटप करण्यात आले. यामुळे यंदाच्या हंगामात ११.३२ हेक्टरवर या रोपांची लागवड होणार आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा मार्ग मिळणार आहे.

वातावरणातील बदलांचा फटका फळबाग लागवडीस दरवर्षी बसत असल्याने फळबाग लागवडीस बांबू लागवड हा उत्तम पर्याय ठरू शकतो. लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना ४ वर्षांनी ५० ते ७५ हजार रुपयेइतके उत्पन्न प्रतिवर्षी मिळू शकते तसेच या लागवडीकरिता शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी तीन वर्षांसाठी ५ लाख ८२ हजार रुपये इतके अनुदान शासनाकडून दिले जाते. याचा तालुक्यातील जास्तीत शेतकऱ्यांनी आपल्या जागेत बांबू लागवड करत लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीने केले आहे. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी विशाल जाधव, कृषि विस्तार अधिकारी पी. डी. गोसावी, तांत्रिक सहायक सचिन भोसले, भावेश कारेकर व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow