संगमेश्वर : उक्षी घाटात पुन्हा ट्रक अडकला

Aug 28, 2024 - 14:09
 0
संगमेश्वर :  उक्षी घाटात पुन्हा ट्रक अडकला

संगमेश्वर : गुगल मॅपद्वारे शॉर्टकट वापरून उक्षी घाटातून प्रवास करताना सोमवारी (ता. २६) पहाटे कोळसा भरलेला ट्रक अडकला. त्यामुळे रात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक खोळंबली. १९ ऑगस्टलाही अशाच प्रकारे एक ट्रक सायंकाळच्या सुमारास फसला होता. सविस्तर वृत्त असे की, ३० टन कोळसा भरलेला ट्रक उक्षी घाटमार्गे खाली उतरत असताना एका अवघड वळणावर ड्रायव्हरला वळणाचा अंदाज न आल्याने तो फसला. ही घटना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक खोळंबली होती.

अपघात होऊ नये यासाठी ड्रायव्हर आणि क्लिनरने दोन्ही बाजूला वाहने थांबवली; मात्र सकाळी ही घटना उक्षी येथील ग्रामस्थांना कळल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रकचालकाला मार्गदर्शन करून हा ट्रक सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बाहेर काढला. या मार्गावर आतापर्यंत अशा प्रकारच्या पाच घटना घडल्या आहेत. ग्रामस्थांनी सांगूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 28/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow