रत्नागिरी : प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे बेशुद्धावस्थेत सापडलेल्या प्रौढाचा मृत्यू

Jul 31, 2024 - 10:27
 0
रत्नागिरी : प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे बेशुद्धावस्थेत सापडलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी : शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अनोळखी प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. 

ही घटना मंगळवार ३० जुलै रोजी सकाळी ८ वा. सुमारास निदर्शनास आली. पालिकेचे कर्मचारी प्रथमेश भोसले हे सकाळी क्रीडा संकुल येथे साफसफाई करत असताना अनोळखी प्रौढ ज्याचे अंदाजे वय ४५ हा दिसला. त्यांनी तातडीने या बाबत शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अनोळखीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या बाबत शहर पोलिस ठाण्यात या बाबत नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 31-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow