चिपळूण : सावकारी व अॅट्रॉसिटी प्रकरणी राधा लवेकर यांचा शोध सुरूच

Jul 31, 2024 - 10:34
 0
चिपळूण : सावकारी व अॅट्रॉसिटी प्रकरणी राधा लवेकर यांचा शोध सुरूच

चिपळूण : सावकारी व अट्रॉसिटी गुन्हा दाखल असलेल्या राधा लवेकर हिच्या घरी दोन दिवस पोलिस अटक करण्यासाठी गेले असता ती घरातून गायब झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. 

बहादूरशेख येथील एका महिलेने राधा लवेकरकडून २० हजारांचे कर्ज घेतले होते. ते पैसे परत केल्यावर त्या बदल्यात घेतलेली कागदपत्रे परत मिळावीत, यासाठी पीडित महिलेने मागणी केली असता तिला जातीवाचक शिविगाळ केली होती. त्या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाला अटक करण्यासाठी शनिवारी व सोमवारी पोलिस पथक तिच्या खंड चिपळूण येथील घरी गेले असता ती गायब असल्याने पोलिसांना सापडली नाही. दरम्यान, पोलिस तिचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 31-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow