रत्नागिरी : माहेर संस्थेत 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा

Aug 20, 2024 - 11:51
 0
रत्नागिरी : माहेर संस्थेत 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा

रत्नागिरी : रत्नागिरी येथील अनाथ निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

संध्याहोम निराधार पुरुषांचे आश्रम, कारवांचीवाडी, रत्नागिरी येथे संस्थेचे प्रकल्प प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच माहेर संस्था, हातखंबा, निवळी फाटा येथे महिला व मुला मुलींच्या विभागात बाल कल्याण समिती सदस्य अँड. प्रिया लोवलेकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रिया लोवलेकर यांनी आपल्या कर्तव्यातून देशसेवा करावी व स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी व्यक्तींना आदर्शवत ठेवावे असे उपस्थित मुला मुलींना मार्गदर्शन केले. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सुर्वे, माहेर संस्थेतील सर्व कर्मचारी, प्रवेशित, महिला, पुरुष व बालके उपस्थित होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 20-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow