लांजात वन विभागाने बसवले ट्रॅप कॅमेरे

Jul 31, 2024 - 12:14
 0
लांजात वन विभागाने बसवले ट्रॅप कॅमेरे

लांजा : लांजा तालुक्यात बिबट्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाकडून कुवे, वाडगाव, वेरवली या गावात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

बिबट्यांकडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याची नुकसानभरपाई देण्याचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात आला आहे. लांजा तालुक्यात गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या वाढली आहे. वन विभागाची जागृती आणि जंगल भाग झाडी वाढल्याने आणि फासकी लावून जंगली प्राणी शिकार करण्याचे प्रमाण कमी झाल्याने बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक बिबटे भक्ष्य शोधण्यासाठी
नागरी वस्तीकडे येऊ लागले आहेत. कुत्री, मांजरे त्यांच्यावर हल्ले वाढले आहेत तसेच पाळीव जनावरे यांच्यावर हल्ल्याच्या घटनाही वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर वन विभाग सतर्क झाला असून नागरिकांच्या मागणीनुसार काही ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाडगाव येथे लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्यांची कोणतीही हालचाल दिसून आली नाही, वेरवली गावातही कॅमेऱ्यामध्ये हालचाल दिसली नाही. कुवे गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या आपल्या बछड्यांसह फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या तक्रारीनुसार वन विभागाने या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. खेरवसे येथील शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचा अहवाल देण्यात आला आहे. वाडगाव येथे एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या घराशेजारी येत असल्याचे दिसून येत आहे. शिरवली येथील गवा रेडे यांच्या मुक्त संचारामुळे वनविभाग सतर्क झाला आहे. गतवर्षी झालेल्या नुकसानीची पाहणी करून वन विभागाने संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow