खेड : दाऊदची मालमत्ता घेणाऱ्या 'त्या' वकिलाचा रत्नागिरी पोलिसांवर गंभीर आरोप

Aug 31, 2024 - 11:43
Aug 31, 2024 - 11:48
 0
खेड : दाऊदची मालमत्ता घेणाऱ्या 'त्या' वकिलाचा रत्नागिरी पोलिसांवर गंभीर आरोप

खेड : दाऊद कासकर कोकणातील खेडमधील मालमत्तेचा काही भाग सरकारकडून विकत घेताना दिल्ली येथील वकील भूपेंद्र भारद्वाज यांना धमकवण्यात आल्याची तक्रार त्यांनी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. या तक्रारीत त्यांनी रत्नागिरी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

जे लोक मी मालमत्ता खरेदी केल्यानंतर धार्मिक विधी करण्यासाठी तिथे गेल्यानंतर तेथे व्यत्यय घालण्यासाठी आले त्यांच्यासोबत पोलिस चहापान करत होते, असा आरोप त्यांनी केला आहे मात्र व्यक्तीवर कारवाई न कराता व याबाबत योग्य तपास न करता फाइल बंद करत असल्याबाबत वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी महराष्ट्राचे पोलिस महासंचालकांना यांना पत्र दिले असून, याचा योग्य तपास न झाल्यास पुढील पंधरा दिवसांत आपण मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नोव्हेंबर २०२० ला विकत घेतली ही जागा फेब्रुवारी २०२४ रोजी सब रजिस्टर कार्यालयातून त्यांच्या नावावर करण्यात आली. जागा नावावर झाल्यानंतर जागेचे मालक भारद्वाज यांनी त्या जागेत जाऊन होमहवन करण्यास सुरुवात केली २३ फेब्रुवारी २०२४ रोजी होमहवन करतेवेळी काही लोकांनी त्यांच्या या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच दुसऱ्या दिवशी पुन्हा होमहवन करण्यासाठी गेले असता होमहवनाचे काही साहित्य चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. याच दरम्यान दाऊद इब्राहिम कासकर यांच्या जागेत काही करायचे नाही, असादेखील धमकीचे फोन त्यांना आले. भारद्वाज यांनी रत्नागिरी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत जे लोक व्यत्यय घालण्यासाठी आले त्यांच्यासोबतच पोलिस चहापान करत होते, असा आरोप केला आहे. मात्र, कोणत्याही व्यक्तीवर कारवाई न करता व याबाबत योग्य तपास न करता ही फाईल बंद करत असल्याबाबत अॅड. भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 31/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow