लांजातील लोकअदालतीत १६ प्रकरणे निकाली

Aug 1, 2024 - 10:27
Aug 1, 2024 - 11:28
 0
लांजातील लोकअदालतीत १६ प्रकरणे निकाली

लांजा : तालुका विधी सेवा समितीतर्फे शनिवार, २७ जुलै रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकआदालतीमध्ये लांजा येथील न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या फौजदारी खटल्यापैकी एकूण १५, तर दिवाणी प्रकरणांपैकी १ प्रकरण निकाली काढण्यात आहे.

प्रलंबित खटल्यामधून एकूण २९ लाख १६ हजार ५४५ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच बँकेच्या वादपूर्व प्रकरणांमध्ये एकुण ७ प्रकरणे निकाली झाली असून, त्यातून ५ लाख १७ हजार एवढी तडजोड रक्कम झाली आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्यामधील ३ प्रकरणे निकाली झाली असून, १ प्रकरणात महिला सासरी नांदायला गेली आहे. या लोकअदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश पी. आर. भोसले यांनी, तर पॅनल सदस्य म्हणून अॅड. समीर दळवी यांनी काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow