रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनानिमित्त १५ जूनला विशेष मेळावा

Jun 13, 2024 - 16:08
 0
रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनानिमित्त १५ जूनला विशेष मेळावा

त्नागिरी : ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनानिमित्त १५ जूनला कुवारबाव येथे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

कुटुंबातील आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ तसेच त्यांच्या भोजन, निवास आणि आरोग्य यांची योग्यरीत्या काळजी घेण्यासाठी शासनाने ज्येष्ठ नागरिक चरितार्थ पालन पोषण कायदा २००७ अमलात आणला आहे.

या कायद्याच्या प्रचार आणि प्रसिद्धी तसेच जनजागृतीसाठी दरवर्षी १५ जून हा दिवस ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे १५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता कुवारबाव येथील ज्येष्ठ नागरिक भवनात विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात रत्नागिरी येथील स्वयंसेतू या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती श्रद्धा कळंबटे ज्येष्ठांना सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीने समाज प्रबोधनपर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनाही मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. हा मेळावा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी नसून ज्येष्ठांचे पाल्य, त्यांच्या सुना या कौटुंबिक घटकांबरोबरच समाजसेवक, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा सेविका यांनीही उपस्थित राहून ज्येष्ठांच्या छळ आणि अवहेलना प्रतिबंध कायद्याच्या जाणीव जागृतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे आणि उपाध्यक्ष राजेंद्र कदम यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:36 13-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow