महाराष्ट्रातील प्रत्येक पोलिस ठाण्यात 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष'

Aug 1, 2024 - 14:25
 0
महाराष्ट्रातील प्रत्येक पोलिस ठाण्यात 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष'

खेड : महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष' स्थापन करावेत, असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने १९ जुलै २०२४ रोजी काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कमिटीने एक प्रसिद्धी पत्रक काढून महाराष्ट्र पोलिसांच्या या आदेशाचे स्वागत केले आहे.

राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. डेरिंग दोरजे यांच्या सहीने असलेल्या आदेशात म्हटले आहे की, 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३' च्या कलम ५ (१) अन्वये, महाराष्ट्र शासनास प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन, महाराष्ट्र शासन, सदर अधिनियमातील कलम ५ (२) मध्ये उद्धृत केलेली कर्तव्ये पार पाडण्याकरिता पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहायक आयुक्त (गुन्हे), तसेच पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलिस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) यांची दक्षता अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्याच्या तसेच, शासन पत्र, गृहविभाग, क्र. अधिनियम ०७५१/प्र.क्र.३२४/विशा-६, दि.१८/०३/२०१६ मध्ये नमुद केल्यानुसार 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून हे आदेश सर्व पोलिस आयुक्त, सर्व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठवले गेले आहेत.

कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत
'अंनिस'च्या समितीच्या राज्य कमिटी सदस्य मुक्ता दाभोलकर, नंदिनी जाधव याबाबत म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या पोलिस प्रशासनाने राज्याच्या प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे जे आदेश दिले आहेत. त्याबद्दल संघटनेच्या वतीने पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन, अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्थापन करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे आश्वासन पाऊल आहे. यामुळे जादू‌टोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कक्षातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जा‌दुटोणाविरोधी कायद्याचे मोफत प्रशिक्षण देण्यास तयार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow