मिऱ्या-नागपूर महामार्गावर तडे; डांबराने डागडुजी
साखरपा : मिऱ्या-नागपूर महामार्गाला गेलेल्या तड्यात अखेर डांबर भरण्यात आले आहे. याविषयी वृत्त प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाला जाग आली असून, त्या तड्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. मिऱ्या-नागपूर साखरपानजीक बंगल्यासमोर महामार्गाला सरकारी डाक पेट्रोलपंपाजवळच्या पॅचच्या काँक्रिटीकरणाचे काम झाल्यावर महिन्याभरातच त्याला सुमारे २० ते ३० फूट लांबीचा तडा गेला होता.
याविषयी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने ही भेग आणखी वाढते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. गेले चार ते पाच दिवस साखरपा परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा फायदा घेत महामार्ग प्रशासनाने तातडीने पावले उचलत या भेगेची डागडुजी केली आहे. सोमवारी सकाळी या भेगेत डांबर भरण्यात आले. ही भेग तात्पुरती बुजवण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 02/Aug/2024
What's Your Reaction?