संगमेश्वर : गोळवलीतील नांगरणी स्पर्धेत १३७ बैलजोड्या सहभागी

Aug 2, 2024 - 11:45
Aug 2, 2024 - 13:47
 0
संगमेश्वर : गोळवलीतील नांगरणी स्पर्धेत १३७ बैलजोड्या सहभागी

संगमेश्वर : तालुक्यातील गोळवली येथे आयोजित नांगरणी स्पर्धेत गावठी बैलजोड्या गटात ९७, तर घाटी बैलजोड्या गटात ४० जणांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.

शेती कष्टातून सुटका मिळवून तरुण पिढी शहराकडे जात असल्यामुळे शेतीकामे करणे, नांगरणे, लावणी करणे किंवा अन्य शेतीची मशागतीची कामे पांची तरुणाईला आवड कमी होऊन चालणार नाही. याच निरीक्षण हेतूने पुन्हा शेतीसाठी पेरणी, उखळ, चिखल नांगरणी, आदींसाठी कष्टाची आवड निर्माण व्हायलाच पाहिजे, अशा चिंतन विचाराने हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली या मंडळाने गोळवली येथे नांगरणी स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये गावठी बैलजोड्या ९७ व घाटी बैल ४० जोड्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत दहा विजयी झालेल्या बैलजोडीच्या स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी उद्योजक सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठापन, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष येराडे, माजी सभापती कृष्णाजी हरेकर, युवा नेतृत्व सिद्धेश निकम, धामणीतील श्रद्धा हॉटेल उद्योजक, प्रभाकर घाणेकर, सनराईज हॉटेल उद्योजक योगेश पाध्ये, आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतीच्या आवडीसाठी प्रयत्न
तरुणाईमध्ये शेतीकामे करणे, नांगरणे, लावणी करणे किंवा अन्य शेतीची मशागतीची कामे यांची तरुणाईला आवड कमी होऊन चालणार नाही. याच निरीक्षण हेतूने पेरणी, उखळ, चिखल नांगरणी, आदींसाठी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 02/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow