चिपळूणातील साहिल ठाकरेने निरीक्षणाआधारे स्वतःची काढली मूर्तिशाळा

Aug 2, 2024 - 11:33
Aug 2, 2024 - 16:35
 0
चिपळूणातील साहिल ठाकरेने निरीक्षणाआधारे स्वतःची काढली मूर्तिशाळा

साखरपा : सामाजिक भान जागरूक असेल तर हातून कृत्ती घडतेच. चिपळूण येथील आयटीआय झालेल्या २६ वर्षीय युवकाने हेच दाखवून दिले आहे. साहिल केरू ठाकरे या युवकाने पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तीचा ध्यास घेतला आहे. मूर्तिकार आर्ट स्टुडिओ या नावाने साहिलची मूर्तिशाळा पाग इथे प्रसिद्ध आहे. आज साहिल केवळ शाडू मातीच्याच मूर्ती काढतो. 

साहिल चिपळूण पाग गोपाळकृष्णवाडी इथे राहतो. शाळेत असल्यापासून त्याला मूर्तिकलेची आवड निर्माण झाली. नववीत असताना ही आवड निर्माण झाली. शाळेत असताना ईको क्लबच्या माध्यमातून साहिलने मित्रांबरोबर कागदाच्या लागद्यापासून पहिली गणेशमूर्ती तयार केली होती. तिला बक्षिसही मिळाले होते. शाळेतून घरी येताना वाटेत एक गणेश मूर्तिशाळा होती. साहिल तिथून येता-जाता त्या मूर्तिशाळेत तयार होणाऱ्या मूर्ती पाहत असे. त्यातून आवड वाढत गेली. मग, त्याच मूर्तिशाळेत तो स्वतः मूर्ती काढायला लागला. तिथे कोणी रितसर शिक्षण दिले नाही. मूर्तिशाळेत काम करणारे अन्य कामगार मूर्ती कशा काढतात, हे साहित पाहत असे आणि त्या निरीक्षणाच्या जोरावर साहिल स्वतः मूर्ती काढायला लागला.

साहिलने आयटीआय करत वायरमनचे शिक्षण पूर्ण केले आहे एक वर्ष त्याने महावितरणमध्ये कामही केले आहे. पण त्यात तो रमला नाही. मूर्तिकलेची आवड त्याला शांत बसू देत नव्हती. त्यातूनच स्वतःच्या मूर्तिशाळेचा विचार पुढे आला. त्यानंतर कोरोनानंतर २०२२ ता स्वतःची मूर्तिशाळा सुरू केली मूर्तिकार आर्ट स्टुडिओ या नावाने साहिलची मूर्तिशाळा पाग इथे प्रसिद्ध आहे. आज साहिल केवळ शाडू मातीच्याच मूर्ती काढतो. त्यासाठी लागणारी माती त्याला चिपळूणच्या एका माती विक्रेत्याकडे उपलब्ध होते.

मूर्तीशाळेचा अक्षय तृतीयेला प्रारंभ
अक्षय तृतीयेला मातीपूजन करून साहिलची मूर्तिशाळा सुरू होते. या कामात त्याला त्याचे काही मित्र मूर्ती घडवण्यात रंगवण्यात मदत करतात. मूर्ती तयार करण्यासाठीचे हात, पाय यांचे साचे त्यानं स्वतः तयार केले आहेत. त्यातून तो कोणत्याही रूपातील गणेशमूर्ती घडवू शकतो याशिवाय नागपंचमीतर मातीचे नाग आणि हरतालिकाही तो तयार करतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:01 PM 02/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow