जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Aug 3, 2024 - 11:03
 0
जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ

खेड : खेडमध्ये शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. सकाळपासून शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढल्याने येथील नद्या दुथडी भरून वाहत असून जगबुडी नदी धोक्याची पातळीजवळ वाहत आहे. त्यामुळे पाणी शहरात शिरण्याचा धोका आहे.

गेले चार दिवस पावसाचा जोर ओसरल्याने जगबुडीच्या पाणीपातळीत घट झाली होती; परंतु ती इशारा पातळीवरून वाहत होती. शुक्रवारी सकाळपासूनच तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे खेड परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जगबुडी नदीची पाणीपातळी वाढली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धोक्याची पातळीपर्यंत जगबुडी पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने व्यापारी व नागरिकांना सतर्क राहण्याच्या आणि पाण्यात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 03-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow