पहिल्या श्रावण सोमवारी श्री क्षेत्र मार्लेश्वर पायी दिंडी
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर येथील श्रीमत् भागवत नाम सांप्रदाय मंडळ व संगमेश्वर तालुका वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने पहिल्याच श्रावण सोमवारी मुरादपूर येथील श्री राधाकृष्ण मंदिर ते श्री क्षेत्र मार्लेश्वर असा पायी दिंडी सोहळा काढण्यात आला.
या पायी दिंडी सोहळ्याला मुरादपूर येथून सकाळी ८ वा. सुरुवात झाली. या पायी दिंडी सोहळ्यात तालुक्यातील अबालवृद्ध, महिला, वारकरी व भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या सर्वांनी हर हर मार्लेश्वर व ज्ञानोबा राया माझा विठोबा राया असा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरात मार्लेश्वर तीर्थक्षेत्रापर्यंत जाऊन स्वयंभू मार्लेश्वराचे दर्शन घेतले.
या पायी दिंडीने मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्याच सोमवारी काढण्यात आलेल्या दिंडीत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 06/Aug/2024
What's Your Reaction?