रत्नागिरी एसटी विभागाला १५ कोटींचे देणे
रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागाचा आर्थिक पाय आणखी खोलात रूतला आहे. इंधन पुरवणाऱ्या ऑईल कंपन्यांसह स्पेअरपार्ट, टायर, कर्मचारी वेतन, देखभाल दुरूस्तीचे सुमारे १५ कोटी एसटी देणेकरी आहे.
उधारीच्या मर्यादाबाहेर ऑईल कंपन्यांचे देणे असल्याने रोख ५० लाख भरल्याशिवाय महामंडळाला डिझेल टैंकर मिळत नाही. शनिवार, रविवार कमी प्रवासी भारमान झाल्याने महामंडळाला ३५ लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यात टँकर मागवणे शक्य नसल्याने एसटीला डिझेल तुटवड्याला तोंड द्यावे लागले. त्यामुळे सोमवारी शहरी, ग्रामीण भागातील १५८ एसटी फेऱ्या रद्द होऊन मोठे नुकसान सोसावे लागले.
एसटी विभागाला होती म्हणून एसटी विभागाने देवरूखहुन डिझेल मागवले होते; परंतु, पंपाने एअर पकडल्याने तांत्रिक बिघाडाने हे डिझेलही गाडयांमध्ये भरता आले नाही. परिणामी, सकाळी साडेअकरा नंतरच्या रत्नागिरी शहर आणि ग्रामीणच्या फेऱ्यांवर मोठा परिणाम झाला. अचानक गाडया न आल्याने प्रवाशांची ससेहोलपट झाली. याची माहिती काल एसटी विभागाने दिली.
डिझेल तुटवडयामळे सोमवारी रत्नागिरी विभागातील शहरी आणि ग्रामीण भागातील १५८ फेऱ्या रद्द झाल्या. दिवसाला या गाइया सुमारे ५ हजार ७९४ किमी धावतात. त्या सोमवारी धावल्या नाहीत. या गाड्यांना दररोज १० हजार लिटर डीझेल लागते. सोमवारी ऑईल कंपन्यांकडून डिझेल घेतले; परंतु पंपाने एअर पकडल्याने ते गाडयांमध्ये भरता आले नाही, असे एसटी प्रशासनाने सांगितले मिरजहून डिझेल टैंकर आला असून, आता वाहतूक सुरळीत झाली आहे.
जिल्ह्याला सुमारे ५६ हजार लिटर डिझेल लागते. यावर ७२० बसेस धावतात, त्यामध्ये ३४ शिवशाही, २६ स्लिपर, ४० सिटी बसचा समावेश आहे. ऑईल कंपन्यांकडून ५० लाख भरून डिझेल टैंकर खरेदी केला जातो. रत्नागिरी एसटी विभाग बीपीसीएल ऑईल कंपनीचे १ कोटी, तर आयओसीएल कंपनीचे ५ कोटी देणे आहे. उधारीवर टैंकर देण्याची मर्यादा संपल्याने एसटी विभागाला रोख पैसे भरून्च डिझेल टैंकर खरेदी करावा लागतो, त्याचबरोबर रत्नागिरी विभाग स्पेअरपार्ट, देखभाल दुरुस्तीचे महिन्याला १ कोटी ५० लाख, टायर नवीन आणि रिमोल्ड, स्वच्छता एकूण सुमारे १५ कोटी रुपये देणे आहे. ४५ टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आर्थिक आणि मनुष्यबळाच्यादृष्टीने रत्नागिरी एसटी विभाग प्रचंड अडचणीत आहे.
महिन्याला लागतात ३०० टायर
गाड्यांचे १० दिवसाला ग्रीसिंग करावे लागते. महिन्याला सुमारे ३०० टायर लागतात. रिमोल्ड ७०० टायर याचा खर्च देखभाल दुरुस्तीचा हा खर्च मे महिन्यात २ कोटीवर जातो. त्यात १५ वर्षानंतर अनेक गाड्या भंगारात काढल्या जातात, अशी विकट परिस्थिती रत्नागिरी एसटी विभागाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
डिझेल पंपात बिघाड झाल्यामुळे सोमवारी डिझेल असतानादेखील गाड्यांमध्ये ते भरता आले नाही. या तांत्रिक अडचणीमुळे रत्नागिरी विभागातील एसटीच्या फेऱ्या अचानक रद्द कराव्या लागल्या आणि प्रवाशांची गैरसोय झाली; परंतु आता वाहतूक पूर्ववत झाली आहे. - संदीप पाटील, एसटी वाहतूक नियंत्रक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 07/Aug/2024
What's Your Reaction?