माळनाका येथे दोन दुचाकींच्या धडकेत दोघेजण जखमी

Jun 18, 2024 - 11:00
 0
माळनाका येथे दोन दुचाकींच्या धडकेत दोघेजण जखमी

रत्नागिरी : शहरातील माळनाका येथे दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. शहर पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य चंद्रशेखर गोवळकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १२) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास माळनाका ते थिबा पॅलेस जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल लॅण्डमार्क समोर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नजवान सिराज भाटकर (रा. शिवखोल, राजिवडा, रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एडब्लू८४४७) सोबत नागेश कृष्णा पवार यास घेऊन जात असताना लॅण्डमार्क हॉटेल येथे रस्ता ओलांडत असताना थिबापॅलेस ते माळनाका जाणाऱी दुचाकी (क्र. एमएच-०८ एएल ४५८१) वरील स्वार गोवळकर याने भाटकर यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नजवान भाटकर व नागेश पवार हे दोघे जखमी झाले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कदम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 18-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow