रत्नागिरी : मच्छीमार कामगाराचा मृत्यू

Aug 8, 2024 - 10:46
 0
रत्नागिरी : मच्छीमार कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथे जाळे विणण्याच्या कंपनीतील परराज्यातील कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री १०.५५ वा. जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

बेहरा पुरुषोत्तम दामोदरम (५८, मूळ रा. श्रीकाकुलम, आंध्रप्रदेश सध्या रा. रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत कंपनी मालक ताजुद्दीन होडेकर (५५, रा. खडक मोहल्ला मिरकरवाडा, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. 

त्यानुसार, त्यांच्या मच्छीमारीसाठी लागणारे जाळे विणण्याच्या कंपनीत वेहरा दामोदरम हा कामाला होता. मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याच्या पोटात दुखू लागल्याने ते त्याला पेठकिल्ला येथील डॉक्टरकडे घेउन गेले होते. त्यानंतर कामाच्या ठिकाणी परतल्यावर बेहराला उलटी होउन पुन्हा त्याची तब्वेत बिघडल्याने तो रात्री ८.३० वा. झोपला होता. दरम्यान, नेहमीप्रमाणे तो जेवणासाठी न उठल्याने मालक होडेकर यांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 08-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow