रत्नागिरी : मनसेची बदनामी करणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीवर कारवाई करा : अविनाश सौंदळकर

Aug 8, 2024 - 10:07
Aug 8, 2024 - 11:02
 0
रत्नागिरी :  मनसेची बदनामी करणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीवर कारवाई करा : अविनाश सौंदळकर

पाचल : मनसे पदाधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्या आरजू टेक्सोल या कंपनीची चौकशी करून जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे रत्नगिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

रत्नागिरीतील आरजू टेक्सोल कंपनीकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबधित काही पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या गैरव्यवहारामुळे आधीच वादग्रस्त असणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीवर शेकडो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे व हजारो पानी आरोपपत्र दाखल असून या कंपनीशी संबंधित अनेक आर्थिक घोटाळ्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. या प्रकरणात काही संचालकांना या पूर्वी अटकही झालेली होती तर एक संचालक अद्याप फरार आहे. असा पूर्वइतिहास असणाऱ्या या कंपनीने केलेले आरोप व यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे म्हणजे पक्षाची निव्वळ बदनामी करण्याचा डाव असल्याचे आम्हाला वाटते, असे सौंदळकर यांनी म्हटले आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्या या कंपनीची चौकशी करून जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे रत्नगिरी जिल्हाध्यक्षक सौंदळकर यांनी केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

या कंपनीकडून आर्थिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी सदर मनसे पदाधिकारी कंपनीच्या संपर्कात आले. ही असतील याबाबत दुमत नाही. मात्र, आपण याची निष्पक्षपणे चौकशी करून या प्रकरणाची सत्यता सर्व अंगाने पडताळावी, अशी मागणी ही सौंदळकर यांनी केली आहे.

या नंतर संबंधित मनसे पदाधिकारी जर या प्रकरणात दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करावी. याचबरोबर या कंपनीवर दाखल असणाऱ्या फसवणुकीच्या सर्व प्रकरणांतही कडक कारवाई करण्यात यावी तसेच फरार संचालकांना ही लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी सौंदळकर यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 08/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow