रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रतिदिन ७०० रुग्ण उपचारांस

Aug 9, 2024 - 11:54
 0
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रतिदिन ७०० रुग्ण उपचारांस

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज ६०० ते ७०० रुग्ण विविध उपचार घेण्यासाठी येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली. संपूर्ण मोफत उपचार, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांचा ओढा वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध आजारांवरील डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच पूर्णत मोफत उपचारांमुळे सर्वसामान्यांचा कल हा शासकीय रुग्णालयात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

याआधी जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज २५०- ३०० रुग्ण प्रतिदिन उपचारांसाठी दाखल होत होते. मात्र येथे होणारे उपचार आणि सोयी सुविधांमुळे हाच आकडा वाढल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर रुग्णालयात पायाभूत सुविधा देखील निर्माण करण्यात येत आहेत. रंगरंगोटी, स्वच्छता आदी कामांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षांत जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

रुग्णालयासाठी २५ कोटी
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अपग्रेडेशनसाठी नुकतेच पालकमंत्री उदय सामंत यांनी २५ कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे या इमारतीला नवा साज चढत असून, रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही सोयी- सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत.

संपूर्ण मोफत उपचार, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांचा ओढ वाढत आहे. वैद्यकीय महाविद्यालयामुळे डॉक्टरांची कमतरता हा विषय निकाली लागणार आहे. - डॉ. भास्कर जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow