Ratnagiri : कुपोषण, बालमृत्यू टाळण्यासाठी जनजागृती

Aug 9, 2024 - 11:22
Aug 9, 2024 - 15:22
 0
Ratnagiri  : कुपोषण, बालमृत्यू टाळण्यासाठी जनजागृती

रत्नागिरी : राष्ट्रीय माता बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत युनिसेफ या स्वयंसेवी संस्थेमार्फत शून्य मातामृत्यू व शून्य बालमृत्यू या संकल्पनेतून सर्व आरोग्यसंस्थेत स्तनपान जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. स्तनपानाअभावी कुपोषण, आजारपण व बालमृत्यू टाळण्यासाठी स्तनपान जनजागृती सप्ताहाद्वारे स्तनपानाचे महत्त्व व फायदे सांगण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला, या प्रसंगी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाल यांनी जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताहाविषयी मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी आठल्ये, वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार कुंभार, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेडकुळे, ए. एन. पेडणेकर, आरोग्य सहाय्यक प्रमोद लिंगायत, मंगेश जंगम, बेबीनंदा खामकर उपस्थित होत्या. स्तनपान जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे हिरकणी कक्षाची स्थापना केली आहे. सर्व हिरकणी कक्षात बाळासाठी निःसंकोचपणे मातांना स्तनपान करता येईल तसेच आशा व आरोग्यसेविकेकडून त्याबाबत आरोग्य शिक्षण मिळेल, अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शासकीय कार्यालये, विविध शासकीय व खासगी संस्था, सरकारी दवाखाने, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मॉलमध्ये काम करणाऱ्या व कामानिमित्त आलेल्या स्तनदा मातांना आपल्या बाळांना स्तनपान देण्यासाठी हिरकणी कक्षात सुरक्षित जागा उपलब्ध असते. त्यामुळे याचा उपयोग सर्व स्तनदा मातांनी केला पाहिजे, बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व पोषक घटक स्तनदा मातेच्या दुधात असतात. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाला निव्वळ स्तनपान दिले पाहिजे. त्यानंतर स्तनपान बंद न करता त्यासोबत पूरक आहारपण दिला पाहिजे, असे आवाहन डॉ. पल्लवी पगडाल यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow