गुहागर : शृंगारतळीतील गोविंदा मोबाईल शॉपी फोडणारे झारखंडमधील चोरटे

Jun 7, 2024 - 12:01
Jun 7, 2024 - 13:51
 0
गुहागर : शृंगारतळीतील गोविंदा मोबाईल शॉपी फोडणारे  झारखंडमधील  चोरटे

गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील गोविंदा मोबाईल शॉपीमधील २७ लाखांच्या बंपर चोरीमधील चोरटे हे झारखंडमधील असल्याचे गुहागर पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आले आहे. चोरटे हाती लागले नसले तरी त्यांना सहकार्य करणारा व त्यामध्ये सहभागी असलेल्या त्यांच्या भावाला गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिली.

तालुक्यातील शृंगारतळीमधील गोविंदा मोबाईल शॉपीमधील २७ लाखांचे मोबाईल व ९० हजारांची रोकड चोरी गुहागर पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजबरोबर चिपळूण बाजारपेठेतील विविध चोऱ्या, चोरी करण्याचा केलेला प्रयत्न, एका हार्डवेअरमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साहित्य घेतानाचे फुटेज मिळून आले. त्यानंतर एसटी बस स्थानक, रेल्वेस्टेशन आदी भागातही त्यांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून अखेर आरोपी नक्की कोण याचा शोध लावण्यात त्यांना यश आले आहे.

या तपासामध्ये झारखंड येथे पोहचून त्या चोरांचे घर गाठले. मात्र या चोरीमध्ये सहभागी असल्याचा संशय धरून त्याच्या भावाला ताब्यात घेतले आहे. लवकच उर्वरीत चोरटे हाती लागलीत, असा विश्वास विभागीय पोलिस अधिकारी राजमाने यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 07/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow