करबुडे मुळगाव शाळेत दप्तरांचे वाटप

Aug 10, 2024 - 17:16
 0
करबुडे मुळगाव शाळेत दप्तरांचे वाटप

रत्नागिरी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा करबुडे मुळगाव या शाळेमध्ये, उपप्रादेशिक परिवहन विभाग रत्नागिरी आणि समर्थ रंगभूमी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व होतकरू अशा 50 विद्यार्थ्यांना दप्तरे पुरविण्यात आल
      
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक मुंडेकर सर यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.


श्री शिंदे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम यासंदर्भात मुलांशी छान संवाद साधला. या विषयाबाबत मुलांना किती माहिती आहे हे अनेक प्रश्न विचारून त्यांनी समजून घेतले, समाधान व्यक्त केले आणि मुलांना सोप्या भाषेत वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. समर्थ रंगभूमीचे अध्यक्ष श्रीकांत पाटील आणि मिलिंद सावंत यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
      

पाटील मॅडम मोटार वाहन निरीक्षक यांनीही मुलांना शुभेच्छा दिल्या. श्री शिंदे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, श्री मोहिते सहा. मोटार वाहन निरीक्षक, संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, मिलिंद सावंत, सुहास साळवी, जयदेव शिंदे, चंद्रमोहन देसाई, शिक्षक वृंद या सर्वांच्या सहकार्याने एक सुंदर उपक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:45 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow