खेडमध्ये एसटीचे वेळापत्रक कोलमडले..

Aug 22, 2024 - 09:54
Aug 22, 2024 - 10:31
 0
खेडमध्ये एसटीचे वेळापत्रक कोलमडले..

खेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथील कार्यक्रमासाठी आगाराने एसटी बस गेल्याने बुधवारी दिवसभर एसटीचे वेळापत्रक बिघडले. 

माजी आमदार संजय कदम यांनी बसस्थानकात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धाव घेउन प्रशासनाला जाब विचारला. बसस्थानकात ताटकळत बसलेल्या प्रवासी व विद्यार्थी यांचे हाल पाहून एसटी प्रशासनाचा निषेध संजय कदम व त्यांच्या कार्यकत्यांनी केला. येथील आगाराकडे पुरेशा बसेस नसल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागता प्रशासनाला बसची संख्या अपुरी असल्याचे माहिती असूनही बसेस पाठवण्यात आल्याने संजय कदम आक्रमक झाले. खेड आगारातून नियमित सुटणाऱ्या ग्रामीण भागातील १०० पेक्षा अधिक फेऱ्या रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे पुणे, मुंबई व कोल्हापूर या लांब पल्ल्याच्या एसटी फेर्यांची त्यामध्ये समावेश होता, या वेळी उपजिल्हाप्रमुख विजय जाधव, दर्शन महाजन, दत्ता भिलारे, अंकुश कदम, राजू संसारे, मंदार शिर्के, स्वप्नील पाटील, आदी उपस्थित होते.

रत्नागिरी येथे शासकीय कार्यक्रमासाठी खेड आगारातील एसटी बसेस गेल्याने ग्रामीण भागात जाण्यासाठी बस उपलब्ध झाल्या नाहीत - आशा मोरे, प्रवासी, अस्तान


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow