भक्ष्यावर झडप घालताना पाण्याच्या टाकीत पडून भक्ष्यासहित बिबट्याचा मृत्यू

Aug 12, 2024 - 10:26
 0
भक्ष्यावर झडप घालताना पाण्याच्या टाकीत पडून भक्ष्यासहित बिबट्याचा मृत्यू

राजापूर : भक्ष्याचा पाठलाग करताना भक्षासह सांडपाण्याच्या सिमेंटच्या टाकीमध्ये पडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना दि.१० रोजी रायपाटण टक्केवाडी येथे घडली. दरम्यान टाकीतील पाण्यात गुदमरून बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे राजापूर वन विभागाकडून सांगण्यात आले. सुमारे अडीच ते तीन वर्षांचा मादी जातीतील हा बिबट्या होता. 

याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 10 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मौजे- रायपाटण, टक्केवाडी येथील रामचंद्र बाळकृष्ण रोडे यांच्या घराजवळ सांडपाण्यासाठी बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या टाकीमध्ये बिबटया मृत अवस्थेत आढळून आला. याची माहिती टक्केवारी पोलिस पाटील मृन्मयी पांचाळ यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनीवरून दिली.

त्यानंतर वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सांडपाण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाकीमधील पाण्यात मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. त्याच्या बाजूलाच ज्या भक्ष्याचा त्याने पाठलाग केला होता. ते मांजर देखील मृत होऊन पडले होते.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. पशुधन विकास अधिकारी प्रभास किनरे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई, चिपळूणचे सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल किरण ठाकूर, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, रत्नागिरी चिपळूण वनक्षेत्रपाल किरण ठाकूर, राजापूरचे वनपाल जयराम बावदाणे, राजापूरचे वनरक्षक विक्रम कुंभार, रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, गणेश गुरव, निलेश म्हादये, निलेश चांदे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 12-08-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow