जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Aug 12, 2024 - 10:36
 0
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

त्नागिरी : एकच मिशन जुनी पेन्शन, शिक्षणसेवक पद रद्द करा, या घोषणांनी रत्नागिरी शहर रविवारी दुमदुमले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व जुनी पेन्शन संघटना समन्वय समितीच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयावर जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच शिक्षणसेवक पद रद्द करणे यांसह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाची सुरुवात माळ नाका येथून झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाची सांगता होऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी परिभाषित पेन्शन योजना सरकारने लागू केली आहे. यातदेखील बदल करण्यात येऊन आता जीपीस या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. परंतु यामुळे कर्मचाऱ्यांचे म्हातारपणीचे आयुष्य अंधकारमय बनले आहे. त्यामुळे १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह शिक्षणसेवक योजना रद्द करावी, DCPS खात्यात जमा असणाऱ्या रकमांवर आजपर्यंतचे व्याज मिळावे, सुधारित संचमान्यता निकष रद्द करावेत, शिक्षक भरतीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, बीएलओ कामे शिक्षकांकडून काढून अन्य यंत्रणेमार्फत करून घ्यावीत, एमएससीआयटीची मुदत वाढवून मिळावी, नवभारत साक्षरता अभियानसह अशैक्षणिक व ऑनलाइन कामे इतर यंत्रणेमार्फत करून घ्यावीत, अशा मागण्यांसह धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना, तसेच शिक्षकेतर संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शवून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 12-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow