खेडशीनाका येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यावर गुन्हा

Jul 23, 2024 - 10:28
 0
खेडशीनाका येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी नाका येथे चायनीज सेंटरच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी बसलेल्या प्रौढाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई रविवार, २१ जुलै रोजी रात्री ८.१५ वा. करण्यात आली. अशोक गोपाळ पुनसकर (५२, मुळ रा. पडवे गुहागर सध्या रा. खेडशी नाका) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री तो खेडशी नाका येथील एका चायनिज सेंटरच्या बाजुला समोर १८० मिली दारुची बाटली ठेवून पिण्यासाठी बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 23-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow