अंगणवाडी सेविका मानधनवाढीच्या प्रतीक्षेत....

Aug 12, 2024 - 14:19
 0
अंगणवाडी सेविका मानधनवाढीच्या प्रतीक्षेत....

ठाणे : दीर्घकाळ संप चालल्यानंतर राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता अद्यापही न केल्याने राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका सध्या नाराज असल्याचे चित्र आहे.

सध्या राज्यात सुमारे १०४ नागरी व ४४९ ग्रामीण प्रकल्पांतील अंगणवाडी केंद्रांत सुमारे २ लाख अंगणवाडी सेविका आहेत. अंगणवाडी सेविकांना १० हजार मानधन मिळते. त्यात साडेचार हजार रुपये केंद्र, तर साडेपाच हजार राज्य सरकार देते. मदतनीसांना साडेपाच हजार रुपये मानधन मिळते. त्यात २, २५० केंद्र, तर २,७५० रुपये राज्य सरकारचा वाटा असतो. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांना कामासाठी खूप पायपीट करावी लागते. त्या तुलनेत मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. त्यामुळे सातत्याने सेविका आणि त्यांच्या संघटना मानधनवाढीची मागणी करत आहेत.

मानधनवाढीसाठी संघटनांनी ४ डिसेंबर ते २५ जानेवारी असा ५४ दिवसांचा संप केला. आशा सेविकांच्या मानधनात सरकारने वाढ केली; पण अंगणवाडी सेविकांच्या संघटनांना दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला का? - राजेश सिंह, संघटक सचिव, राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow