रत्नागिरी : अमली पदार्थ नियंत्रणासाठी बंदरावर पोलिस गस्तीची नौका मालकांकडून मागणी

Aug 12, 2024 - 11:05
Aug 12, 2024 - 17:20
 0
रत्नागिरी : अमली पदार्थ नियंत्रणासाठी बंदरावर पोलिस गस्तीची नौका मालकांकडून मागणी

रत्नागिरी : मच्छीमार नौकांवरील खलाशांची संपूर्ण कागदोपत्री माहिती आणि मिरकरवाडा जेटीवरील अमली पदार्थ विक्री संदर्भात माहिती पोलिसांना लवकरात लवकर देण्यात यावी, अशा सूचना पोलिस अधीक्षकांनी नौका मालकांच्या बैठकीत केल्या. पर्ससीन नेट मच्छीमारांनी खलाशांची माहिती देण्यासाठी एक महिना मुदत देण्याची विनंती केली.

सागरी सुरक्षा संदर्भात पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पर्ससीन, पारंपरिक मच्छीमार नौका मालकांशी संवाद साधला. परप्रांतीय नेपाळी किंवा इतर परराज्यातील खलाशी, तांडेल जिल्ह्यातील मच्छीमार नौकांवर काम करतात. या सर्व कामगारांची ओळख पटवणारी कागदोपत्री माहिती पोलिसांकडे देणे बंधनकारक आहे. ही माहिती लवकरात लवकर देण्याच्या सूचनाही पोलिस अधीक्षकांनी केल्या.

पर्ससीन नेट मासेमारी १ सप्टेंबरपासून सुरू होते. परप्रांतीय खलाशी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात येतात. त्यामुळे त्यांची कागदोपत्री माहिती जमा करण्यात वेळ गेल्यास त्याचा मासेमारीसाठी समुद्रात जाण्यावर परिणाम होईल. त्यामुळे ही माहिती देण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्याची विनंती पर्ससीन नेट मच्छीमारांकडून करण्यात आली. बंदरांवर अमली पदार्थांची विक्री होते. अमली पदार्थांच्या सेवनामुळे नौका मालकांना त्रास होतो. दर शुक्रवारी बंदरांवर पोलिसांची गस्त ठेवण्याची विनंतीही नौका मालकांकडून करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow