राजापूर : भू येथील बीएसएनएलचा टॉवर बंद

Jul 2, 2024 - 16:17
 0
राजापूर : भू येथील बीएसएनएलचा  टॉवर बंद

राजापूर : गेले आठवडाभर तालुक्यातील भू येथील बीएमएलचा टॉवर बंद असल्याने या परिसरातील बीएसएनएलची सेवा पूर्णतः कोलमडली आहे. त्याचा फटका या परिसरातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही बीएसएनएल विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने खिगगिणीचे माजी सरपंच आणि राजापूर अर्बन बँकेचे संचालक विजय पाध्ये यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचे सूतोवाच केले जाहे.

भू येथील बीएसएनएलच्या टॉवरमध्ये नेहमीच काहीना काही बिघाड होत असल्याने सेवेचा बोजवारा उडत आहे. याबाबत कायम तक्रारी होत असल्याने संबंधित विभागाने येथील विद्युत वितरण कंपनीचा विद्युतपुरवठा खंडित करत सौरऊर्जाचे पैनल उभारत विद्युत पुरवठा चालू केला, मात्र सौरउर्जेच्या पैनल द्वारे टॉवर चालवण्यात येत असल्यापासून अधिकच समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी दूरध्वनी सेवा मिळत नसल्याने हैराण झाल्याची माहिती माजी सरपंच पाध्ये यांनी दिली.

गेल्या आडवडाभरापासून तर बीएमएनएलचा टॉवर बंद अवस्थेत आहे. यामुळे येथील शेतक-यांचे बैंकिंग व कर्जवाटपसारखी कामे ठप्प झाली आहेत. यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला असता कार्यालयात कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत नागरिकांच्या तक्रारीकडे दुलेंक्ष केले जात आहे तर, वरिष्ठांकडे विचारणा केली असताना लवकरच टॉवर कार्यान्वित होईल, अशी उत्तरे देत वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची? असा सवाल पाध्ये यांनी उपस्थित केला आहे. येत्या आठवडाभरात बीएसएनएलचा टॉवर कायर्यान्वित न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:45 PM 02/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow