बीअर शॉपीबाहेर दारू पिण्यासाठी बसलेल्या दोघांवर कारवाई

Aug 13, 2024 - 11:12
 0
बीअर शॉपीबाहेर दारू पिण्यासाठी बसलेल्या दोघांवर कारवाई

रत्नागिरी : शहरातील स्टेडियमच्या बाजूला असलेल्या बीअर शॉपीबाहेर दारू पिण्यासाठी बसलेल्या दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई शनिवार, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० ते ७.४५ या कालावधीत केली. प्रथमेश प्रमोद देसाई (३१) आणि प्रमोद शंकर आचार्य (३२) ती गुन्हा दाखल करण्यात आलेल्या
दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही शनिवारी सायंकाळी स्टेडियमच्या बाहेर दारू पिण्यासाठी बसलेले असताना शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow