लायन्स क्लब रत्नागिरी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे मातृमंदिर देवरुख येथे शालेय तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Aug 13, 2024 - 13:50
 0
लायन्स क्लब रत्नागिरी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे मातृमंदिर देवरुख येथे शालेय तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

◼️ जिजाऊ सामाजिक संस्था आणि लायन्स क्लब देवरुख यांचे विशेष सहकार्य 

रत्नागिरी :  लायन्स क्लब रत्नागिरी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कडून मातृमंदिर देवरुख येथे शालेय तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

जिजाऊ सामाजिक संस्था आणि लायन्स क्लब देवरुख यांचे विशेष सहकार्य लाभले. काल झालेल्या सेवाकार्यसाठी ॲड. ममताबेन मुद्राळे यांच्या आई नीरा सूर्यकांत मुद्राळे यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवरुख येथील मातृमंदिर संस्थेला दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि शैक्षणिक वस्तू देण्यात आले. तसेच जिजाऊ सामाजिक संस्थेने 15 डझन वह्यांचे वाटप केले. 

या वेळी रत्नागिरी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री. एस एस गोसावी, विधिसेवा प्राधिकरण रत्नागिरी सचिव श्री. निखिल गोसावी, लायन्स क्लब रत्नागिरी अध्यक्ष ला गणेश धुरी, देवरुख लायन क्लब अध्यक्ष ला माया गोखले, ला महेंद्र मांडवकर, ला प्रदीप हरचिरकर, ला मनोज गोखले, ला अमित सावंत, ला अभि अग्रवाल, ला गौरी पाडळकर, ला चेतन पाडळकर तसेच रत्नागिरी लिओ क्लब अध्यक्ष लिओ श्रेयस रसाळ, लिओ अभिषेक बेकवाडकर उपस्थित होते. 

मातृमंदिर अधीक्षक सफिरा कुवरझ सेक्रेटरी विनायक पानवलकर, उपाध्यक्ष श्री विलास कोळपे आणि मातृमंदिर संस्था सदस्य उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow