रत्नागिरी : 'बाल्को 'बाधित शेतकऱ्यांचा २२ ऑगस्टला मोर्चा

Aug 14, 2024 - 11:44
 0
रत्नागिरी : 'बाल्को 'बाधित शेतकऱ्यांचा २२ ऑगस्टला मोर्चा

रत्नागिरी : रत्नागिरीत १९६७ ला भारत सरकारने बाल्को या कंपनीमार्फत चंपक मैदान परिसरातील जागेवर अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची सुमारे १२०० एकर जमिन संपादित केली होती, पण आजतागायत त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प आलेला नाही. त्या जागेपासून भूमिहीन झालेले शेतकरी पुन्हा एकदा न्याय हक्कांसाठी २२ ऑगस्टला सकाळी ११ वाजता परटवणे नाक्यापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर अॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा निर्धार मोर्चा काढाण्यात येणार आहे. अशी माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र आयरे यांनी दिली.

हरी ओम मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजेंद्र आयरे म्हणाले, शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या महिन्यात त्या जागेवर सामूहिक शेती आंदोलन केले होते. त्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जागा संपादित केल्या होत्या. त्या जागा परत देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करून शासन, प्रशासन लक्ष वेधले आहे. थोडेसे उत्पत्न्न घेत असलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे भूमीहीन रहावे लागले. त्या जमिनी भांडवलदारांना मौजमजेसाठी सरकारने दिल्या. त्या जमिनी परत मिळवण्यासाठी ५३ वर्षे लढा दिला जात आहे. पण त्या लढ्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. कारखाना आला असता तर सुमारे २ ते अडीच हजार नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या.

अनेक वर्षे ही जमीन अशीच पडून आहे. येथे कारखाना आणू शकले नाही.. त्या शेतजमिनी आम्हाला परत करा या मागणीसाठी प्रकल्प बाधित शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनात उतरले आहेत. प्रकल्पबाधितांच्या मागणीचा जर विचार झाला नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा आयरे यांनी दिला.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow