चिपळूणातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे रविवारी लोकार्पण

Aug 14, 2024 - 11:26
Aug 14, 2024 - 12:30
 0
चिपळूणातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे रविवारी लोकार्पण

चिपळूण : शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राशेजारी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे व चिपळूणच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नारायण तलावाचे लोकार्पण १८ ऑगस्टला पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.

सोमवारी (ता. १२) रात्री छत्रपती  शिवरायांचा पुतळा चिपळूणमध्ये दाखल झाला आहे. नारायण तलावाच्या सुशोभीकरणाचे कामही पूर्णत्वाकडे आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सायंकाळी सात वाजता या दोन्ही चिपळूणच्यादृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होईल. छत्रपती शिवरायांचा पुतळा तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिला असून, या सोहळ्याला त्यांची खास उपस्थिती लाभणार आहे. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सायंकाळी ४ वाजता शिवव्याख्यान, नारायण तलावाचे रविवारी लोकार्पण, सायंकाळी ६ वाजता पोवाडा आणि ७ वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण असा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित राहणार असल्याचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow