रत्नागिरी : पावस येथे मंगळागौर स्पर्धेमध्ये गावडे आंबेरेचा प्रथम क्रमांक

Aug 16, 2024 - 10:02
Aug 16, 2024 - 13:35
 0
रत्नागिरी : पावस येथे  मंगळागौर स्पर्धेमध्ये गावडे आंबेरेचा प्रथम क्रमांक

पावस : तालुक्यातील पावस जिल्हा परिषद गटात झालेल्या मंगळागौर स्पर्धेत गावडे आंबरे येथील श्रीराम समूहाच्या महिलांनी प्रथम क्रमांक पटकावला, या स्पर्धेत १५०० पेक्षा जास्त महिलांनी उपस्थिती लावली होती.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकायनि तसेच उदय सामंत फाउंडेशन व शिवसेना तालुका महिला आघाडीच्या माध्यमातून पावस जिल्हा परिषद गटात मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद गटातील १५०० पेक्षा जास्त महिलांनी उपस्थिती लावली होती. या स्पर्धेमध्ये १३ संघांनी सहभाग घेतला होता.

यामध्ये श्रीराम समूह गावडे- आंबेरे गटाने प्रथम क्रमांक फटकावला. मागील वर्षीही याच संघाने यश मिळवले होते. यंदा या संघाने चांगली कामगिरी करत सातत्य ठेवले. या संघाला दहा हजार रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. पावस येथील मंगळागौरी स्पर्धा मेर्वी येथील मातोश्री मंगल कार्यालयात घेण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मान श्री स्वामी समर्थ नाखरे उंबरवाडी हे मंडळ ठरले. या संघाला सात हजार रोख रक्कम आणि मानपत्र देण्यात आले तर तिसरा क्रमांक शेख अली भाटेवाडी पावस यांनी मिळवला असून, पाच हजार रोख रक्कम आणि मानपत्र देण्यात आले. या वेळी उत्तेजनार्थ शिवसेना शाखा गावडे आंबेरे संघाची निवड झाली. त्यांना तीन हजार रुपये पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. मेवों येथील मंगळागौर कार्यक्रमात १३ वर्षाच्या नाखन्ऱ्यातील भक्ती मोरे या मुलीने आपल्या आवाजाने उपस्थितांची मने जिंकली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow