'राहुल गांधींचे भारतीय नागरिकत्व रद्द करा', सुब्रमण्यम स्वामींची हायकोर्टात याचिका

Aug 16, 2024 - 15:36
Aug 16, 2024 - 15:56
 0
'राहुल गांधींचे भारतीय नागरिकत्व रद्द करा', सुब्रमण्यम स्वामींची हायकोर्टात याचिका

नवी दिल्ली: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी वाढू शकतात. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी राहुल गांधींचेभारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली असून, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.

या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावानी होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींकडे ब्रिटिश पासपोर्ट
राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आणि ब्रिटिश पासपोर्ट असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्टेटस रिपोर्ट मागवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याचिकेत सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की, त्यांनी पाच वर्षांपूर्वी राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत गृहमंत्रालयाकडे तक्रार केली होती. अद्याप गृह मंत्रालयाने या मुद्द्यावर काय निर्णय किंवा कारवाई केली हे स्पष्ट केले नाही?

घटनेच्या कलम 9 चा उल्लेख
सुब्रमण्यम स्वामी यांनी गृहमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, युनायटेड किंगडममध्ये 2003 साली बॅकअप्स लिमिटेड नावाची कंपनी नोंदणीकृत झाली होती. त्या कंपनीत राहुल गांधी संचालक आणि सचिव होते. 2005 आणि 2006 मध्ये दाखल केलेल्या कंपनीच्या वार्षिक रिटर्नमध्ये राहुल गांधींचे राष्ट्रीयत्व ब्रिटिश असल्याचे नमूद करण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow