आयएएस-आयपीएस होण्याच्या मोहातून बाहेर पडा : उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Aug 16, 2024 - 15:48
Aug 16, 2024 - 15:58
 0
आयएएस-आयपीएस होण्याच्या मोहातून बाहेर पडा : उपराष्ट्रपती जगदीप धनखड

दिल्ली : 'वृत्तपत्रांची पानं कोचिंग सेंटर्सच्या जाहिरातीने भरलेली असतात. वेग-वेगळे कोचिंग सेंटर्स आपल्या जाहिरातीत एकच चेहरा दाखवतात. या जाहिरातींचा खर्च जे तरुण-तरुणी कठोर परिश्रमाने तयारी करतात त्यांच्याकडून आलेला आहे.

नागरी सेवा अथवा सिव्हिल सर्व्हिसच्या मोहातून बाहेर पडा. इतर क्षेत्रांतही आकर्षक संधी आहेत. तेथे प्रयत्न करा, असा सल्ला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तुरुणांना दिला आहे. ते शुक्रवारी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली येथे पीजी बॅचच्या 'इंडक्शन' कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.

नागरी सेवांबाबत विद्यार्थ्यांच्या मोहासंदर्भात चिंता व्यक्त करत उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, "मला वर्तमानपत्रांमध्ये सध्या कोचिंग सेंटर्सच्या जाहीरातींचाच भडिमार दिसतो. पान एक, पान दोन, पान तीन... अशा तरुण-तरुणींच्या चेहऱ्यांनी भरलेले असतात, ज्यांना यश मिळाले आहे. अनेकदा एकच चेहरा अनेक संस्था वापरतात."

"सिव्हिल सेवांच्या मोहातून बाहेर पडा" -
धनखड म्हणाले, "या जाहीरातींचा भडिमार बघा... यासाठी लागणारा खर्च आणि एक एक पैसा स्वत:चे भविष्य सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुण मुला-मुलींकडून आला आहे. आता वेळ आली आहे, चला, आपण सिव्हिल सर्व्हिसच्या मोहातून बाहेर पडू. आपल्याला माहीत आहे, संधी कमी आहेत. आपण दुसरे मार्गही शोधायला हवेत. इतरही काही आकर्षक संधी आहेत, ज्या आपल्याला (राष्ट्रासाठी) योगदान देण्यास सक्षम करतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:11 PM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow