रत्नागिरी : ग्राहक पेठेतर्फे गणेशोत्सवपूर्व प्रदर्शनाचे आयोजन

Aug 17, 2024 - 15:01
 0
रत्नागिरी : ग्राहक पेठेतर्फे गणेशोत्सवपूर्व प्रदर्शनाचे आयोजन

त्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे गणेशोत्सवपूर्व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. गणपती उत्सवानिमित्त महिलांच्या व्यवसायाला बाजारपेठ मिळावी व वृद्धी होऊन, आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

येत्या ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत प्रदर्शन शांतीनगर येथील बालाजी मंगल कार्यालयात होणार आहे. प्रदर्शनात महिला बचत गटातील महिला व इतर उदयोन्मुख उद्योजिका महिलांना व्यवसायाची सुवर्णसंधी आणि गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी ग्राहकांना विविध आकर्षक वस्तू एकाच छताखाली मिळणार आहेत.

प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री साडेआठ अशी आहे. प्रदर्शन कालावधीत विविध पारंपरिक खेळ, फुगड्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महिलांसाठी आरोग्यविषयक उपक्रम व विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

स्टॉल बुकिंगसाठी रत्नागिरी ग्राहक पेठेच्या संचालिका प्राची शिंदे (९४२२३७६२२४ किंवा ९७६४४१७०७९) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow