रत्नागिरी : लायन्स क्लब मार्फत नगरपरिषद मधील १३० कर्मचाऱ्यांना राख्या बांधून राखीपौर्णिमा साजरी

Aug 19, 2024 - 15:04
 0
रत्नागिरी : लायन्स क्लब मार्फत नगरपरिषद मधील १३० कर्मचाऱ्यांना राख्या बांधून राखीपौर्णिमा साजरी

रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरी ही संस्था रत्नागिरी मधील एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेमार्फत विविध समाज उपयोगी सेवाकार्य रत्नागिरी जिल्हा मधे केले जातात. असंच एक अनोखा उपक्रम लायन्स क्लब रत्नागिरी मार्फत आयोजित करण्यात आला. निमित्त होत राखीपौर्णिमेच रत्नागिरी नगरपरिषदेतील कर्मचारी रोज रत्नागिरी स्वच्छ राहावी या साठी प्रामाणिक पणे कार्य करीत असतात. अशा सेवाभावी सफाई कर्मचार्यांना लायन्स क्लब मधील महिला सभासदंमार्फत राख्या बांधण्यात आल्या.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन क्लब अध्यक्ष ला गणेश धुरी यांचा मार्फत करण्यात आले होते. या वेळी लायन्स क्लब चा महिला सभासद ला श्रेया केळकर, ला शिवाणी पानवलकर ला स्नेहा केळुस्कर, ला प्राची शिंदे, ला साक्षी धुरी, ला स्नेहल नागवेकर, ला शामल सेट तसेच क्लब सचिव ला विशाल ढोकळे उपस्तिथ होते. उपस्तिथ १३० सफाई कामगारांना राख्या बांधून ओवाळणी करण्यात आली. तसेच सर्व सफाई कर्मचाऱ्यांना क्लब तर्फे लाडू आणि स्नॅक्स ची सोय करण्यात आली. सर्व कर्मचारी वर्ग ने या वेळी लायन्स क्लब चा या अनोख्या उपक्रमाची प्रशंसा केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 19-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow