मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या संभाव्य रत्नागिरी दौऱ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Aug 20, 2024 - 11:30
Aug 20, 2024 - 11:30
 0
मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या संभाव्य रत्नागिरी दौऱ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

त्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या बुधवारी (दि. २१ ऑगस्ट) रत्नागिरीत येण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी विविध विभाग प्रमुखांकडून सोमवारी आढावा घेतला.

बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निश्यामक दल, फिरते स्वच्छतागृह यांची सुविधा ठेवावी. पोलीस विभागाने पार्किंगची व्यवस्था करावी, वाहतुकीचे नियमन करावे. पाणी, ओआरएस पॅकेट, फूड पॅकेट आदींचीही चोख व्यवस्था करावी. दिलेली प्रत्येक जबाबदारी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून पार पाडावी. 

बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 20-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow