कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार, विचारवंत ज्ञानेश महाराव रत्नागिरीत

Aug 20, 2024 - 17:19
Aug 20, 2024 - 17:29
 0
कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार, विचारवंत ज्ञानेश महाराव रत्नागिरीत

रत्नागिरी : कै.मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे दिनांक 23 ऑगस्ट रोजी उदघाटन होणार असून या स्पर्धेचे बक्षिस वितरण शनिवार दिनांक  24 ऑगस्ट 2024 रोजी  प्रथितयश लेखक, संपादक, विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने रत्नागिरीकरांना प्रथमच त्यांचे  आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीवर परखड विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.

कै.मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा एस पी हेगशेट्ये महाविद्यालयात दरवर्षी आयोजित केली जाते. महाराष्ट्रातील मानाची, नामांकित आणि 4 दशकांची दीर्घ परंपरा या स्पर्धेला लाभली असून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला आहे.  ज्वलंत, निर्भीड  विषय , पारदर्शक निकाल  आदी वैशिष्टयानी स्पर्धा राज्यभरात नावलौकिकाला आली आहे.

या वर्षी ही स्पर्धा दिनांक 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट 2024 रोजी होत असून  माध्यमिक गटाची दिनांक 23  रोजी तर कनिष्ठ  व वरिष्ठ महाविद्यालयीन गटाची 24 रोजी होणार आहे. 

या स्पर्धेचे बक्षिस वितरण लेखक, ज्येष्ठ पत्रकार चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते होणार आहे.  त्यानिमित्ताने त्यांचे विचार ऐकण्याची सुवर्ण संधी विध्यार्थ्यांना मिळाली आहे. हा कार्यक्रम  4 वाजता एस पी हेगशेट्ये महाविद्यालयात होणार आहे. या व्याख्यानाचा लाभ सर्वानी घ्यावा, असे आवाहन प्राचार्या डॉ आशा जगदाळे यांनी दिली आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:54 20-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow