खेडमध्ये धनगर समाजाचे उपोषण सुरू...

Aug 22, 2024 - 10:40
 0
खेडमध्ये धनगर समाजाचे उपोषण सुरू...

खेड : तालुक्यात भरणे गावात सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ सभागृह मंजूर केले आहे. परंतु, केवळ जागा उपलब्ध होत नसल्याचे कारण मागील दीड वर्ष हे सभागृह उभारण्यास दिरंगाई होत असल्याने खेड तालुका धनगर समाजातर्फे मंगळवार, दि.२० रोजी पासून खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या उपोषणाबाबत माहिती देताना समाज संघटनेचे उपाध्यक्ष श्याम गवळी म्हणाले, पुण्यश्लोक श्रीमती राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे इतिहासात सर्व समाजासाठी केलेले काम सर्वश्रुत आहे. अकाली वैधव्य आल्यानंतर सुद्धा मोठ्या हिमतीने होळकर घराण्याची सुत्रे हातात घेऊन आदर्श राज्यकारभार कसा करता येईल, हे त्यांनी एक स्त्री असून, त्या काळात दाखवून दिले. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यात त्यांच्या स्मरणार्थ सभागृह बांधकामासाठी एकूण ५० ठिकाणे निश्चित केली. त्यासाठी भरीव निधी मंजूर केला आहे. त्यामुळे त्यातील एक सभागृह खेड तालुक्यातील भरणे येथे प्रस्तावित असून, भरणे गावात शासकीय भूखंड उपलब्ध व्हावा व हे सभागृह उभे रहावे म्हणून आम्ही गेले २० महिने शासन दरबारी पाठपुरवठा करत आहोत. परंतु, भरणे गावात शासकीय भूखंड उपलब्ध होत नाही. म्हणून आम्ही दि.५ रोजी निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, दि. २० रोजीपासून उपोषण करण्याचा इशारा देऊनदेखील सभागृह उभारण्याबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याने अखेर आम्ही उपोषण सुरू केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow